Ferrous Ascorbate
Ferrous Ascorbate बद्दल माहिती
Ferrous Ascorbate वापरते
Ferrous Ascorbate ला लोह कमतरता असलेला ऍनेमिया आणि दीर्घकालीन किडनीच्या आजारामुळे आलेला ऍनेमियाच्या उपचारात वापरले जाते.
Ferrous Ascorbate कसे कार्य करतो
फेरसएस्कोर्बेट, ऍंटीएनीमिक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे तोंडाने घेतली जाणारी आयर्न सप्लिमेंट आहे. हे आयरन (फेरस) चे कृत्रिम रूप आहे आणि एस्कोर्बिक ऍसिड (एस्कोर्बेट) सोबत, लहान आतड्यामध्ये आयरन शोषणास प्रोत्साहन देण्यास मदत करते. हे रक्तात आयरनची पातळी वाढवते जे लाल रक्तपेशी किंवा हीमोग्लोबिनच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे.
Common side effects of Ferrous Ascorbate
उलटी, अन्न खावेसे न वाटणे, काळ्या/गडद रंगाची विष्ठा, बद्धकोष्ठता, अतिसार
Ferrous Ascorbate साठी उपलब्ध औषध
Ferrous Ascorbate साठी तज्ञ सल्ला
- पोट ठीक वाटत नसेल तर जेवताना फेरस अस्कॉर्बेट घ्या.
- संसर्गावर उपचारांसाठी (अँटिबायोटिक्स) काही औषधं घेत असाल तर डॉक्टरांना त्याची माहिती द्या.
- पोटात अल्सर असेल किंवा आतड्यातला पेप्टिक अल्सर अथवा दीर्घकालीन आतड्याचा दाह होण्याची समस्या ( रिजनल एन्टरिटिस आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस)
- पोटात दुखणं, अन्न नकोसं वाटणं, उलटी, अतिसार, शौचावाटे रक्त जात असेल, काळ्या रंगाचं शौचाला होणं, रक्ताची उलटी, रक्तदाब कमी होणं, हृदयाचे ठोके वाढणं, रक्तातील साखर वाढणं, डिहायड्रेशन,ग्लानी येणं, चेहेरा फिकट दिसणं, त्वचा निळसर होणं, जोम नसणं, फेफरं येणं असे त्रास जाणवल्यास त्वरिक वैद्यकीय मदत घ्या.
- लहान मुलांसाठी फेरस अस्कॉर्बेटचा वापर करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. .
- गरोदर राहण्याचा विचार करत असाल किंवा स्तनदा असाल तर डॉक्टरांना त्याची कल्पना द्या. .
- लोह पूरकांची (सप्लिमेंटस्) किंवा त्यातील अन्य घटकांची अलर्जी असेल तर ते घेऊ नका. .
- शरीरात लोहाचं प्रमाण अतिरिक्त झाल्यानं निर्माण होणा-या ( हिमोसिडेरोसिस आणि हिमोक्रोमॅटोसिस) समस्या, लाल रक्तपेशींचा जास्त प्रमाणात नाश झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं ( हिमोलिटिक अनिमिया) अथवा लाल रक्तपेशी निर्माण होऊ न शकणं असे त्रास असतील तर ते घेऊ नका.