Ranolazine वापरते
Ranolazine ला हृदयविकाराचा (चेस्ट वेदना)ला टाळण्यासाठी वापरले जाते.
Ranolazine कसे कार्य करतो
Ranolazine हृदयाला लागणा-या ऑक्सिजनच्या आवश्यकतेला कमी करते. यामुळे ऍजायना टाळण्यास मदत मिळते.
Ranolazine चे सामान्य दुष्प्रभाव
अन्न खावेसे न वाटणे, उलटी, डोकेदुखी, गरगरणे, बद्धकोष्ठता, अशक्तपणा
Want to Know More
Read Our Editorial PolicyRanolazine साठी उपलब्ध औषध
Ranolazine साठी तज्ञ सल्ला
- रानोलाझाईन अचानक आलेल्या छातीतील वेदना (अँजायना) साठी घेऊ नये. तुम्हाला छातीत वेदना (अँजायना) झाली तर नेमका कोणता उपचार घ्यावा याचा सल्ला तुमचे डॉक्टर देतील.
- तुमच्या डॉक्टरांशी न बोलता रानोलाझाईन घेणे थांबवू नका.
- रानोलाझाईनमुळे तुम्हाला गरगरु शकते आणि डोके हलके होऊ शकते. हे औषध तुमच्यावर कशाप्रकारे प्रभाव टाकते हे नेमके कळेपर्यंत गाडी, यंत्र चालवू नका, किंवा मानसिक दक्षता आणि समन्वय आवश्य असलेली कामं करु नका.
- चुकलेली मात्रा भरुन काढण्यासाठी दुप्पट मात्रा घेऊ नका.
रानोलाझाईन वापरु नका:
- जर तुम्ही रानोलाझाईनच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल.
- तुम्हाला यकृताचा सिऱ्हॉसिस; मध्यम ते तीव्र यकृताच्या समस्या असतील तर.
- तुम्हाला मूत्रपिंडाची तीव्र समस्या असेल तर.
रानोलाझाईन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः
- तुमचा आजवर एखादा असामान्य इलेक्ट्रोकार्डियोग्राम आला असेल तर.
- जर तुम्ही वयस्कर असाल.
- तुमचे वजन कमी असेल तर.
- जर तुमचे हृदय निकामी असेल तर.



